आमच्याबद्दल

नमस्कार! आम्ही आहोत ज्ञानस्रोत. एक परिपूर्ण शैक्षणिक दृष्टिकोन असलेले व्यासपीठ, जे प्रत्येक विद्यार्थ्याला परवडणारे दर्जेदार शिक्षण देण्याचा फक्त निर्धारच करत नाही, तर प्रत्येकाला प्रतिभाशाली बनवण्याचे ध्येय सुद्धा ठेवतो.

यश हे आता वास्तव आहे!

एक प्रसिद्ध म्हण आहे, "उत्तम शिक्षण हीच उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी आहे आणि हे भविष्य त्यांचेच आहे जे आज तयारी करत आहेत." बरोबर आहे ना? म्हणूनच भारतासारख्या देशात, जो उद्या जागतिक पातळीवर सर्वोच्च स्थानी असणार आहे, त्याची ४१% लोकसंख्या १८ वर्षा पेक्षा कमी आहे. या देशाची नैतिक, संस्कृती आणि भविष्य घडवण्यात शिक्षण खूप महत्वाची भूमिका बजावतो.

ज्ञानस्त्रोत हे +2 स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक अनोखे डिजिटल शैक्षणिक व्यासपीठ आहे, जे 2.4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमामध्ये, तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये सेवा देण्याचा अनोखा अनुभव घेऊन समृद्ध असलेल्या संघाने तयार केले आहे. 23 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या 9 भाषांमधील 14 शिक्षण मंडळे पूर्ण करण्यासाठी आणि जगातील सर्वात वैविध्यपूर्ण शैक्षणिक व्यासपीठ बनण्यासाठी तयार आहे.

ज्ञानस्रोत च का?

ज्ञानस्रोत ॲप संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचे स्थान, भाषा आणि आर्थिक स्थिती विचारात न घेता फक्त त्यांना अभ्यासाची काळजी घेण्यासाठी बनवण्यात आलेले आहे. हे ॲप फक्त इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थी यांच्या पुरताच मर्यादित नाही.

ज्ञानस्रोत ॲप संपूर्ण आधुनिक अभ्यासक्रम तुमच्या भाषेत तेही शालेय पद्धतीने शिकवत. यामुळेच ज्ञानस्रोत केवळ एका शिक्षण मंडळासाठी नसून सर्वांसाठी आहे. आम्ही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गांसाठी पहिला टप्पा पार केलेला आहे. ज्यात ९ भाषांमध्ये १४ बोर्डस समाविष्ट आहेत.

प्रत्येक संकल्पनेचे ॲनिमेटेड आणि ग्राफिकल प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांना विषय समजण्यास मदत करतात. वास्तविक उदाहरणे आणि ॲनिमेशन ने भरपूर असे व्हिडिओ विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान दैनंदिन जीवनात सुद्धा वापरण्यास मौल्यवान ठरतात. ज्ञानस्रोत एक असे शक्तिशाली साधन आहे, जे विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात परिपूर्ण बनवते. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हे एक व्यासपीठ आहे.


विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात विशेष बंधन असून पण खूप वेळा विद्यार्थ्यांना एकाच वेळेस समजत नाही. विद्यार्थी वर्गामध्ये शंका उपस्थित करताना लाजतात. त्याची कारणेही बरीच असू शकतात. पण त्याची चर्चा करण्याची हि जागा नाही. या समस्येवर मात करण्यासाठी ज्ञानस्रोत मधील अनुभवी शिक्षक संपूर्ण अभ्यासक्रम प्रदान करतात. ज्ञानस्रोत मध्ये विद्यार्थी शिक्षकांकडून हवे तितक्या वेळा समजून घेऊ शकतात. रिप्ले आणि रिप्ले. शिक्षक काहीही बोलणार नाहीत. परीक्षेच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना ६ ते ८ महिन्या पूर्वीचे लेक्चर्स आठवत नाहीत. आणि बऱ्याचदा वर्गामध्ये आधीचे लेक्चर्स ची पुनरावृत्ती होणे ही शक्य नसते. अश्या वेळेस ज्ञानस्रोत चे शिक्षक कोणतीही अतिरिक्त शुल्क न घेता उपलब्ध असतात. इंटरनेट असो व नसो, आँफलाईन मोडवर video सुरु करा आणि आपल्या आठवणी ताज्या करा.

आम्ही विविध शैक्षणिक मंडळे अंतिर्भूत करतो, आम्ही अनेक भाषांमध्ये शिकवतो, आम्ही सगळे विषय सोपे बनवतो. आम्ही वैविध्यपूर्ण आहोत, आम्ही ज्ञानस्रोत आहोत!

ज्ञान विरुद्ध शाळा

आता याचे उत्तर द्या -

तुम्ही पुढीलपैकी कशाला जास्त महत्व देता, खरे शिक्षण कि परीक्षेत चांगली श्रेणी?

हाच प्रश्न भारतीय शिक्षण व्यवस्थेतील गुंतागुंत जाणून घ्यायला मदत करतो. हि वस्तुस्थिती खूप दुःखदायक आहे कि विद्यार्थी अश्या शिक्षण व्यवस्थेत वाढतात जिथे त्यांना त्यांचे ज्ञान सिद्ध करण्यासाठी परीक्षेला बसणे आवश्यक आहे, म्हणून यासाठी विद्यार्थी फक्त त्याची तयारीच करत नाहीत, तर त्यात प्राविण्य हि मिळवतात.

असे बोलले जाते कि, ज्ञानस्रोत येथील संशोधन आणि विकास विभाग, ज्ञानाभिमुख आणि परीक्षाभिमुख अभ्यास पद्धतीचे योग्य विलीनीकरण निश्चित करते आणि हाच सर्वात व्यावहारिक दृष्टिकोन आहे, कारण ज्ञान आणि परीक्षा यांना एकमेकांवर ठेवणे दोघांसाठी चुकीचे आहे, ज्ञानस्रोत हे अभिमानाने सांगते कि आम्ही हे संतुलन साधले आहे जिथे विद्यार्थी वर्ग त्यांचा नियमित अभ्यास करताना जास्तीत जास्त परिपूर्ण ज्ञान प्राप्त करतात.

पण कसे?

ज्ञानस्रोत विद्यार्थ्यांच्या मौल्यवान वेळेचा वापर करणाऱ्या पारंपरिक शिक्षण पद्धतीचा वापर न करता, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम प्रणाली चे अनुसरण करतो. ज्ञानस्रोत त्याच वेळी हि पण खात्री करतो कि, कोणत्याही गोंधळा शिवाय, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयाचा योग्य तपशील दिला जाईल. याप्रकारे परिपूर्ण विकासाचा एक साचा तयार होतो.

ज्ञानस्रोत वेगवेगळ्या शैक्षणिक मंडळांनी ठरवलेल्या मार्गाचे पालन करतो.. उदा. पहिल्या सत्राच्या परीक्षेआधी अभ्यासक्रमातील विशिष्ट भाग पूर्ण करावा लागतो. शालेय सत्रांचे हे विभाजन विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय शिक्षण पद्धतीशी जुळवून घेण्यास मदत करेल याची ज्ञानस्रोत काळजी घेतो.

आम्ही सध्याच्या शिक्षण व्यवस्थेला अजून परिपूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी बांधील आहोत.